ಮುದ್ದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ನಿಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಗುಬ್ಬಚ್ಚಿಗಳ ಚಿಲಿಪಿಲಿ ಬ್ಲಾಗಿಗೆ ಹಾರ್ದಿಕ ಸ್ವಾಗತ! ಸುಸ್ವಾಗತ!!

मराठी अंतरभारती इयत्ता दहावी (संयुक्त)

 

 

 मराठी

अंतरभारती

इयत्ता दहावी (संयुक्त)

 

अनुक्रमणिका

 भाग १

अ.क्र.

पाठ/कविता

लेखक/कवी

पृ.क्र.

१.

तू सर्व गाचा त्राता रे (प्रार्थना)

चारुता प्रभुदेसा

 

२.

संतवाणी

() शेखमहमद सांगती देव-संत शेख मद

() जे कां रंजले गांजले - संत तुकारा

 

३.

नाथांची आई

सिंधुताई सपकाळ

 

४.

चिल्ड्रन ऑफ हेवेन

- रेणू गावस्कर

 

५.

खोप्यामधी खोप्या

बहिणाबाई चौधरी

 

६.

मकबरा-माझ्या नाला

डॉ. यू. म. ठा

 

७.

बदलणं म्हणजे...

मल्हार अरणकल्ले

 

 

भाग १

अ.क्र.

पाठ/कविता

लेखक/कवी

पृ.क्र.

८.

सायंकाळची शोभा (कविता)

भा.रा. तांबे

 

९.

तरफ

सुरेश मथुरे

 

१०.

डासपिटिका

अनिल अवचट  

 

११.

हा देश माझा (कविता)

सेनापती बापट

 

१२.

मोर

पां. पि. घरत

 

१३.

मॉरिशस : सागरदर्यातले साखरबेट

दत्ता नायक

 

१४.

भल्लगडी दादा(कविता)

शाहीर कुंदन कांबळे

 

 

 

1.    तू सर्व गाचा त्राता रे (प्रार्थना)  -चारुता प्रभुदेसा

चारुता प्रभुदेसाई (१९६७) : शिक्षिका, लेखिका व कवयित्री. 'किशोर', 'शिक्षणसंक्रमण', 'छात्रप्रबोधन', 'शिक्षणविवेक' या मासिकांमधून लेखन. आकाशवाणी, दूरचित्रवाणी कार्यक्रमांत सहभाग व लेखन. तसेच विविध वृत्तपत्रांतून प्रासंगिक लेखन, आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षिका, त्यांनी विविध शैक्षणिक संस्थांद्वारे आयोजित शैक्षणिक कार्यक्रमांमधून सहभाग घेतलेला आहे व अनेक शैक्षणिक उपक्रम केले आहेत.

सर्व कलांमध्ये ज्याचा वास आहे अशा चराचरामध्ये वसलेल्या निराकाराची केलेली ही प्रार्थना. सर्व जगाचे कल्याण व्हावे, सर्व विश्वात शांती नांदावी, निर्भयता यावी असे मागणे प्रस्तुत कवितेत कवयित्रीने मागितले आहे.

तू सर्व जगाचा त्राता रे तू कला बुद्धिचा दाता रे

जाहलो लीन अम्ही तव चरणी तू अमुचा भाग्यविधाता रे ।।धृ।।

नटराज नर्तनी दिसशी तू गायनी सुरांचा ईश्वर तू

उधळिले रंग तू नभांगणी तू दया शांति निर्माता रे ।।१।।

वरदान तुझे आम्हा दयावे कल्याणदायी सर्वा व्हावे

वसशील आमुच्या नित्य मनी तव कृपा छत्र धरि आता रे ।।२।।

दे शक्ति अम्हा संकटसमयी निर्भयता वसुदे या हृदयी

प्रार्थना हीच अंतर्यामी तुजला विश्वाच्या नाथा रे ।।२।।

शब्दार्थ :

त्राता - तारणारा. दाता देणारा. लीन नम्र. नभांगणी आकाशाच्या अंगणात. छत्र - सावली.

 

प्रस्तुत प्रार्थना ही काव्यानंदासाठी घेतली असून, ती विद्यार्थ्यांकडून तालासुरात म्हणवून घ्यावी.

२. संतवाणी

(अ) शेखमहंमद सांगती सेव

संत शेख महंमद (सतरावे शतक) : संतकवी. संत शेख महंमद यांनी मराठी, हिंदी, उर्दू, फारसी या भाषांत काव्यरचना केली, रूपके, भारूडं, अभंग इत्यादी सुमारे ३०० स्फुट कविता त्यांनी लिहिल्या आहेत. 'योगसंग्राम', 'पवनविजय' 'निष्कलंकप्रबोध' या त्यांच्या मराठीतील प्रमुख ओवीबद्ध रचना आहेत.

प्रस्तुत अभंगात साधूच्या अंतरंगाचे दर्शन घडवले आहे. तसेच साधुत्व ओळखण्याचे निकष विविध दृष्टान्तातून स्पष्ट केले आहेत.

 

केकतीला कांट्याचे वेढे। भितरीं निपजती केवडे।

तैसे साधूचे शब्द गाढे। परोपकारालागीं।।

फणस सर्वांगीं कांटवले। भितरी महा गोडीनें कोंदले।

तैसें साधुहृदय जालें। बोथासंगें परियेसा।।

नारळ कठीण दिसे बाहेर। भितरीं खोबरें अरुवार।

तैसें साधूचें अंतर। बोधें वोसंडले।।

ऐसा सद्‌गुरुर्शी धरा भाव। तो कैसा करावा उपाव।

शेखमहंमद सांगती सेव। सभे श्रोत्यांप्रती।।

शब्दार्थ :

केकती - केवड्याचे झाड, केतकी. निपजणे उत्पन्न होणे, पैदा होणे. गाढे कळकळीचे, भक्तीने युक्त. कांटवले काटेरी. परियेसा ऐका. अरुवार मृदू, कोमल. वोसंडणे ओसंडणे. उपाव उपाय.

 

कृती

(१) खालील आकृती पूर्ण करा.

अभंगात उल्लेखलेली फुले व फळे = केतकी, फणस, नारळ

(२) एका वाक्यात उत्तर लिहा.

संत शेख महंमद यांनी केलेला उपदेश लिहा.

उत्तर: सद्गुरूच्या मनातील भाव स्वत:च्या मनात धारण करावा, असा उपदेश संत शेख महमद यांनी केले आहे.

(३) वैशिष्ट्ये शोधून खालील तक्ता पूर्ण करा.

अभंगात उल्लेखलेल्या गोष्टी/व्यक्ती

बाह्यरंग

अंतरंग

(१) केकती

काट्याने वेढलेले

सुगंधी केवडा

(२) फणस

सर्वांगभर काटे

रसाळ गरे

(३) नारळ

बाहेरुन कठीण

मुलायम खोबरे

(४) संत

कठोर

बोधाने ओसंडलेले

 

(४) स्वमत.

(१) अभंगाच्या आधारे साधुत्व ओळखण्याचे निकष सांगा.

उत्तर: अभंगाच्या आधारे साधुत्व ओळखण्याचे निकष म्हणजेच व्यक्तीच्या आत्मा, मन आणि शरीराच्या सर्व बंधंनापासून मुक्त असणे, आत्मपरिक्षण करणे. संत शेख महंमद या कवितेत सांगतात की केतकी ही काटयांनी भरलेली असते. परंतु त्यामध्ये केवडा जन्माला येतो. फणसाला अंगभर काटे असतात. परंतु अत रसाळ, गोड गरे भरलेले असतात. त्याप्रमाणे साधूचे बोलणे कठोर असले तरी हृदय कोमल असते. 

(२) 'सद्‌गुरूंचे शब्द कठोर असले, तरी त्यांचे अंतःकरण कोमल असते.' या ओळीचा अर्थ स्पष्ट करा.

उत्तर: मानसाच्या जीवनाला जो मार्ग दाखवतो त्यास सद्गुरू म्हणतात. सद्गुरू लोकांना नेहमी उपदेशाचा प्रसाद देत असतात. साधूंनी संगीतलेली शिकवण वरुण कठोर व बोचरी वाटली तरी सद्गुरूचे उपदेशामध्ये मधुर बोल दडलेले असतात. संत शेख महंमद या कवितेत सांगतात की केतकी ही काटयांनी भरलेली असते. परंतु त्यामध्ये केवडा जन्माला येतो. फणसाला अंगभर काटे असतात. परंतु अत रसाळ, गोड गरे भरलेले असतात.

उपक्रम : संत नामदेव यांचे पाच अभंग मिळवून त्यांचे वर्गात वाचन करा.

 

() जे कां रंजले गांजले - संत तुकारा

कृती

(१) योग्य पर्याय निवडा.

(१) साधू म्हणजे अशी व्यक्ती जी......

(अ) रात्रंदिवस ध्यान करते.

(आ) रात्रंदिवस भजन करते.

(इ) दुःखीकष्टी लोकांना आपले समजते.

(ई) रात्रंदिवस भक्ती करते.

(२) परमेश्वराचे अस्तित्व .......... बघावे.

(अ) जे फक्त सज्जन समजले जातात त्यांच्यामध्ये

(आ) रंजल्या गांजल्यांना आपलेसे करणाऱ्यांमध्ये

(इ) समाजासाठी भजन-पूजन करणाऱ्यांमध्ये

(ई) एकांतात तपश्चर्या करणाऱ्यांमध्ये

(२) खालील आकृती पूर्ण करा.

संत तुकाराम महाराज यांनी सांगितलेली साधूची लक्षणे

उत्तर: साधू संत लोक रंजल्या गांजल्यांना आपलेसे समजतात. त्या लोकांतच देव पाहतात.

(३) उत्तरे लिहा.

(अ) साधू ज्यांना हृदयी धरतात ते – ज्यांची कोणी आश्रयदाता नाही त्यांना.

(आ) साधू ज्यांच्यावर पुत्रवत प्रेम करतात त्या व्यक्ती – दास व दासी किंवा नोकरावर पण पुत्रवत प्रेम करतात.

(इ) नवनीताप्रमाणे मऊ असणारे – सज्जन लोक

(ई) संत तुकाराम महाराज यांच्या मते भगवंत ज्यांच्यामध्ये वास करतो ती व्यक्ती – जो रंजल्या गांजल्यांना आपलेसे समजतात, सज्जनप्रमाणे ज्यांना कोणी आश्रयदाता नाही त्यांना आश्रय देतात. नोकरांना पुत्राप्रमाणे प्रेम करतात त्यांच्या हृदयात भगवंत वास करतो.

(४) स्वमत.

अ) 'मृदु सबाह्य नवनीत । तैसें सज्जनाचें चित्त ।।' या ओळींचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.

उत्तर: गोर गरीबांना मदत करणारे, त्यांना आपलेसे समजणारे ज्यांना कोणी वाली नाही त्यांना हृदयी धरून सांत्वन करणारे मृदु मनाचे सज्जन लोकांबद्दल सांगताना सबाह्य म्हणजे आतून व बाहेरून लोणीसारखे मृदु संताविषयी संगितले आहे.

आ) साधू कोणाकोणाला कशी कशी मदत करतात, ते कवितेच्या आधारे स्पष्ट करा.

उत्तर: साधू रंजल्या गांजल्यां लोकांना आपले मानतात, सज्जनप्रमाणे ज्यांना कोणी आश्रयदाता नाही त्यांना आश्रय देतात. नोकरांना पुत्राप्रमाणे प्रेम करतात असे संत तुकाराम महाराज म्हणतात.  

इ) कोणत्याही व्यक्तीतील साधुत्व ओळखण्यासाठी खालीलपैकी कोणता मुद्दा तुम्हांला महत्त्वाचा वाटतो, ते स्पष्ट करा.

(१) त्याची देवभक्ती (२) त्याची तपश्चर्या (३) त्याचे सामाजिक कार्य

उपक्रम: संत तुकाराम महाराज यांचे चरित्र मिळवून वाचा.

                                      ***

 

                         3 . अनाथांची आई

आश्वासक – विश्वास देणारा, खात्री देणारा, वैराण – उजाड, अक्षरशत्रू – निरक्षर वाणसामान किराणा, भुरळ घालणे – आकर्षित करणे, ज्ञानतृषा – ज्ञान मिळविण्याची तीव्र इच्छा.

 

१. योग्य पर्याय निवडा.

() चिंधीला शाळा शिकण्यास मनाई होती, कारण....

() चिंधी घरात सर्वांत मोठी होती.

() त्यांच्या रातील कोणीही यापूर्वी शाळेची पायरी चढले नव्हते.  

() ती आईबाबांची लाडकी होती.

() चिंधीने कविता छापलेला कागद बिळात लपवून ठेवला, कारण......

() चिंधीला छापील कागद आवडायचे.

() सासरच्या लोकांना तिचे वाचन आवडत नसे.

() बिळातून उंदीर-घुशी बाहेर पडू नयेत म्हणून.

२. उत्तरे लिहा.

() बुनियादी ग्रामशाळेत शिक्षकांची नावे - वंदिले गुरुजी, कांबळे गुरुजी

() चिंधी लहानपणी कागद-पेन म्हणून वापर करत होती ती वनस्पती – भराडी वनस्पतीचा काटा पेन म्हणून तर पान कागद म्हणून वापरत असे.

(इ) सिंधुताई सपकाळ यांचा जन्म केंव्हा झाला? त्यांचे पूर्ण नाव काय होते?

उत्तर: सिंधुताई सपकाळ यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४८ रोजी नवरगाव फॉरेस्ट येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव चिंधी अभिमान साठे.

. खालील शब्दसमुहासाठी एक शब्द लिहा.

() अक्षरे ज्याची शत्रू आहेत,असा – निरक्षर.

() ज्ञांनाची तहान - ज्ञानतृषा

४. गटातील वेगळा शब्द ओळखा व तो शब्द वेगळा का आहे, यामधील कारण स्पष्ट करा.

() रमेश, जोसेफ, यास्मि, म्ही

आम्ही- हे शब्द सर्वनाम आहे, इतर सारे शब्द नामपद आहे.

() ते, तुला, आणि, म्ही

आणि- इतर शब्द सर्वनाम असून आणि संबंधसूचक आहे.

() तनुजा, समीर, सुंदर, राधिका

सुंदर- हे विशेषण असून बाकीचे नाम आहेत.

() त्याला, ला, करणे, तुम्हाला

करणे- इतर शब्द सर्वनाम असून करणे हे क्रियापद दर्शवतो.

५. खालील शब्दातील अक्षरावरून अर्थपूर्ण शब्द तयार करा.

दा., संग्रहालयात – हाल, यात, हात, संत संग्रह, हायात .

() ग्राशाळेतील ग्राम, शाळेतील, मळेतील, मल, मशाल

() उपकारक – उप, कार, उपकार, कारक, उकार

() पक्षीसंरक्षणविषयक – पक्षी, संरक्षण, विषय, रक्षण, विष, क्षीण, सांकरण

() जनदा दार, वजन, वज, नर, वर, जन, जर

६. स्वमत.

() लेखिकेने कांबळे गुरुजीबद्दल व्यक्त केलेली भावना तुमच्या शब्दात लिहा.

उत्तर:- कांबळे गुरुजी लेखिकावर खूप माया करीत. शाळेला उशिरा गेली तरी रागावत नसे. त्यांची उबदार माया नसती तर त्या जे थोडीफार शिकले तेवढेही शिकू शकले नसते. आयुष्याचा वैराण वळवंटात जशी सावली असावी, तशी कांबळे गुरुजीची माया वाटायची.

() सिंधुताईंना शिकण्याची खूप तळमळ होती, हे पाठच्या आधारे पटवून द्या. उत्तर: सिंधुताई म्हशी चरायला गेल्यावर भराडीच्या पानाची वही आणि त्याचा काटा पेन म्हणून वापरुन अक्षरे लिहीत असे. ह्यावरून त्यांना शिकायची खूप तळमळ होती हे दिसते.

क्र:

() तुमच्या परिसरात असणार्‍या अनाथ आश्रमास भेट देऊन त्याबाबत माहिती मिळवा.

() आंतरजाल वरील सिंधुताई सपकाळ यांची भाषणे मिळवा व ऐका.

 

४. चिल्ड्रन ऑफ हेवन   - रेणु गावस्कर

शब्दार्थ : तुटपुंजा - अल्प, कमी. आघाडी सांभाळणे बाबदारी सांभाळणे.  पथ्य –नियम. खोबण – लाकडामधील खाच, यक्षप्रश्न – कठीण प्रश्न जीव तोडून पळणे – सर्वशक्तिनिशी पळणे, झुंबड उडणे – गर्दी होणे कोलाहल – मोठा आवाज गडबड, गोंधळ, अग्रेसर – सर्वात पुढे, आकांत माजणे – खूप दु:ख होणे

कृती

(१) खालील आकृत्या पूर्ण करा.

(अ) अली व जहिरा यांचे आयुष्य बदलून टाकणारी घटना

उत्तर: जाहिराचे जीर्ण झालेले बूट शिवायला घेऊन जातानाच आईने उधारीवर भाजी आणायला सांगते. जाहिराचे बूट कचरा गोळा करणारा टाकाऊ समजून घेऊन जातो.  

(आ) अलीचे गुणविशेष

उत्तर: अलीचे आपली बहीण जाहिराशी गट्टी असते.

       (२) तुलना करा.

स्पर्धक अली

इतर स्पर्धक मुले

(१)

(२)

(१)

(२)

(३) अलीच्या बाबतीत प्रस्तुत घटना केव्हा घडल्या, ते लिहा.

(अ) अली अक्षरशः थरारला.

उत्तर: स्पर्धेतील तिसर्‍या नंबरच्या विजेत्याला बुटाची जोडी बक्षीस म्हणून मिळणार असल्याची वाचून आली अक्षरश: अंतर्बाह्य थरारुन जातो.

(आ) अली कमालीचा निराश झाला.

उत्तर: अली शर्यतीत तिसर्‍या नंबर न येता पहिल्या आल्याचे समजताच तो कमालीचा निराश होतो. 

(४) कारणे लिहा.

(अ) दोन्ही मुलांना घराच्या बाहेरच्या कामाची आघाडी सांभाळावी लागायची,

कारण.....

उत्तर: मुळात हातावरच पेठ असलेल्या घरातील गृहिनीला –जाहिरच्या आईला असं दुखणी जडलंय की घरात येणत्या तुटपुंज्या रकमेतले बरेचसे पैस एषधापण्यात जताहेत पुन्हा आई सतत आजारी असल्यानं या दोनही घरच्या, बाहेरच्या कामाची आघाडी सांभाळावी लगतेय ते वेगळंच.

(आ) अलीला दुकानदाराची बोलणी खावी लागली, कारण....

(इ) हेडमास्तरांनी अलीला शाळेत येण्यास बंदी घातली, कारण.....

(५) खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द पाठातून शोधून लिहा.

(१) अनुकूलता x  अडचणी

(३) शेवट x  पहिला

(२) द्रुतगती x

(४) आनंदी x निराश

(६) खालील शब्दांचे पहिले अक्षर बदलून दुसरा अर्थपूर्ण शब्द तयार करा.

उदा., कडक तडक

(अ) कांदा- वांदा

(आ) सुजाण- कुजाण

(इ) स्वाभिमान- अभिमान

(७) स्वमत.  

(१) स्पर्धेत पहिला नंबर पटकावला तरीही अली नाराज झाला, त्याची कारणे तुमच्या शब्दांत सांगा.

(२) तुम्ही आणि तुमच्या भावंडांमधील प्रेम दर्शवणारा एखादा प्रसंग लिहा.

(३) धावण्याच्या स्पर्धेत तुम्हांला प्रथम क्रमांक मिळाला आहे, अशी कल्पना करून तुमच्या भावना स्पष्ट करा.

ಕಾಮೆಂಟ್‌‌ ಪೋಸ್ಟ್‌ ಮಾಡಿ

0 ಕಾಮೆಂಟ್‌ಗಳು