ಮುದ್ದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ನಿಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಗುಬ್ಬಚ್ಚಿಗಳ ಚಿಲಿಪಿಲಿ ಬ್ಲಾಗಿಗೆ ಹಾರ್ದಿಕ ಸ್ವಾಗತ! ಸುಸ್ವಾಗತ!!

सुगमभारती इयत्ता ८वी स्वाध्यायमाला प्रश्नोत्तर

        सुगमभारती इयत्ता ८वी

स्वाध्यायमाला प्रश्नोत्तर

संकलन व लेखन

श्री. दिनेश ठाकूरदास चव्हाण

जि.प.प्राथमिक कन्नड शाळा बबलाद ता. अक्कलकोट जि. सोलापूर

अनुक्रमणिका

. क्र. पाठाचे नाव                                       लेखक/कवी

. भारत अमुचा देश... (गीत)                           शरद कांबळे

. चि चि चिम ण्या...                               विजय तेंडुलकर

. जिकडे तिकडे पाणीच पाणी (कविता )              शंकर वैद्य

. सावलीतून जा आणि सावलीतून ये                 सु. . जोशी

. विश्वविख्यात शास्त्रज्ञ-स्टीफन हॉकिंग            डॉ. किशोर पवार, नलिनी पवार

. कोळ्याची पोर (कविता )                                 सुरेखा गावंडे

. ध्येयपूर्तीचा ध्यास                       लक्ष्मण लोंढे

. पाखरांचे मागणे (कविता )                 प्रेमचंद अहिरराव

. भूमिगत मुमताज                       रहिमत पुरे

१०. जीवन सुंदर करू! (कविता )               शं. . नाईक

११. प्राणी आणि आपण                     ललित गौरी डांगे

१२. संतवाणी () संत एकनाथ ४२

            () संत श्रीनिळोबा

 

 

ला पाठ भारत अमुचा देश....(गीत)

                                    -शरद कांबळे      

ऐका. वाचा. म्हणा.

भारत अमुचा देश आम्हा असे अभिमान

जन्मा आलो येथे आम्ही किती भाग्यवान... ।।धृ.।।

जरी भिन्नता, जशी विविधता

येथे परंतु नांदे एकता

पवित्र, उन्नत आमची ही, संस्कृती महान ।।१।।

फळाफुलांची, हरीतवनांची

नदीशिखरे अन् जलाशयांची

सुंदर, संपन्न भूमी ही, आम्हा जीव की प्राण ।।२।।

शीलवंतांची, बलवंतांची

नितीवंत, प्रज्ञावंतांची

वंदनीय जगती जे त्या , नररत्नांची ही खाण ।।३।।

हे संविधान, तिरंगी निशाण

अमुचा मान अमुची शान

प्रियतम या भारतभूमीचे, गाऊ सदा जयगान ।।४।।

     शरद कांबळे (१९७४) : प्रसिद्ध कवी. विविध वृत्तपत्रे, नियतकालिके यांतून लेख कविता प्रकाशित आहेत. त्यांचा तुझ्या साठीहा चारोळी संग्रह प्रसिद्ध आहे. ठाणे जिल्हा युवा पुरस्कार पंचायत समिती शहापूर शिक्षक पुरस्कार यांसारख्या पुरस्कारांनी ते सन्मानि आहेत. विविधतेतील एकता हे भारताचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. आपले संविधान राष्ट्रध्वज ही आपली श्रद्धास्थाने आहेत.

     प्रस्तुत गीतातून कवी भारतमाते विषयीची गौरवपूर्ण भावना व्यक्त करतात. प्रस्तुत गीतकिशोर’, जानेवारी २०१८ या मासिकातून घेतले आहे.

 

 


 

. चिव चिव चिमण्या....        

                                      -विजय तेंडुलकर

शब्दार्थ : शरणचिठ्ठी- शरणागती. शहामत- हिंमत. रंगपट-नाटकासाठी रंगरंगोटी व कपडे बदलण्याची खोली. हैराण होणे - त्रासून जाणे. कळ-खोडी. उताला येणे (उत्साह) ओसंडून वाहणे. ओळकंबून- लोंबकळून. कहार माजवणे - अतिरेक करणे, प्रचंड गोंधळ करणे. उद्वेगाने - भयंकर रागाने. मामला - गोष्ट. ओतप्रोत भरपूर. -

स्वाध्याय

प्र. १. खालील आकृती पूर्ण करा.

नाटकात मुलांनी साकारलेली पात्रे

झाडाची, पोस्टा च्या पेटीची, इलेक्ट्रिकच्या खांबाची सोंगे घेतलेल्या छोट्या नटनटी

प्र. २. खालील वाक्यांचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.

(अ) मी त्या गावचा नसल्यासारखा उभा राहिलो- लेखकांनी नाटक पाहायला गेले,पण तेथे कोणीच ओळखीचे नसल्याने अनोळखीसारखा उभे राहिले.

(आ) नाटकांची स्पर्धा प्रेक्षागृहातच नाटकाआधी उताला आली होती- ही नाटक सुरू होण्यापूर्वी प्रेक्षागृहामध्ये मुला-मुलींनी नुसता धिंगाणा घातला होता.

प्र. ३. कारणे लिहा.

(अ) छोट्या मैत्रिणीचे आई-बाबा तिचे नाटक बघायला गेले नाहीत, कारण आईला वेळ नव्हता आणि पाप्पांना लहान मुलांची नाटकं पाहण्यात कसलेही इच्छा नव्हती.

(आ) दंग्याला तात्पुरता उतार पडला, कारण प्रेक्षागृहामध्ये अंधार पडला तेंव्हा कोठे लहान लहान मुलांची मस्ती शांत झाली आणि कोणते तरी नाटकं सुरू झाल . गर्दी कमी झाल्याने लेखका तात्पुरता का होईना दंगा कमी झाले म्हणून निश्वास सोडले.

प्र. ४. उत्तरे लिहा. 

(अ) छबूताईंची बोलण्याची लकब- यात्त काय आणखी त्यात्त काय’.

(आ) नाटक जिथे होणार ते ठिकाण- साहित्य संघ मंदिर, मुंबई.

प्र. ५. तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.

(अ) नाटकात नाट्य कमीजास्त असले, तरी या चिमण्या कलावंतांत मात्र ओतप्रोत होते  हा लेखकाचा विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

उत्तर:- चिमुकली मुले मुली नाट्यगृहामध्ये विविध पद्धतीने नाट्यछटा दाखवत होते. कधी कधी चुकले तरी काहीतरी बोलून वेळ मारून नेत होते. त्यामुळे त्यांच्यात चांगला कलावंत निपजत होता.  

(आ) प्रेक्षागृहात लेखकाला आलेले अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.

उत्तर:-

 

प्र. ६. तुमच्या शाळेतील स्नेहसंमेलनाच्या प्रसंगी तुमच्या मित्रमैत्रिणींसमवेत तुम्ही घेतलेले अनुभव व आनंद तुमच्या शब्दांत सांगा.

खेळूया शब्दांशी.

खालील शब्दसमूहांचा अर्थ समजून घेऊन एक एक वाक्य तयार करा.

(अ)     हैराण होणे- त्रासून जाणे

वाक्य: रवी आणि नंदिनी यांच्या खोडकरपणामुळे आजी हैराण झाली होती.

(आ)   कहार माजवणे- प्रचंड गोंधळ करणे

वाक्य: शिक्षक वर्गात उशिरा गेल्यावर मुले कहार माजवतात.

(इ)        उताला येणे- उत्साह ओसंडून येणे

वाक्य: अरुण चायना धावण्याची शरत जिंकल्याची वार्ता ऐकताच गाव सारा उताला आला.  

पत्रलेखन

     पत्र हे आपल्या मनातले भाव / विचार दुसऱ्यापर्यंत लिखित स्वरूपात पोहोचवायचे उत्तम साधन आहे. पत्रलेखनाच्या विषयानुसार पत्राचे दोन प्रमुख प्रकार पडतात.

(१) औपचारिक पत्र

(२) अनौपचारिक पत्र

     यापूर्वीच्या इयत्तांमध्ये तुम्हांला अनौपचारिक या पत्र प्रकारांची ओळख झालेली आहे. आता आपण औपचारिक या पत्रप्रकाराची ओळख करून घेणार आहोत.

     लक्षात घ्या आजच्या तंत्रज्ञान युगात फोनचा वापर वाढल्यामुळे पत्र लिहिणे कमी झाले आहे. तरीही आपल्याला अर्ज करणे,  मागणी करणे, विनंती करणे अशा काही कारणांसाठी पत्र लिहिणे आवश्यक असते व पत्रलेखन कौशल्य प्राप्त होण्यासाठी या इयत्तेत तुम्हांला औपचारिक पत्रलेखनाचा अभ्यास करायचा आहे. आता आपण औपचारिक पत्रलेखनाचे स्वरूप समजून घेऊया.

औपचारिक पत्रलेखनासाठी आवश्यक गोष्टी :

(१) ज्यांना पत्र लिहायचे आहे त्यांच्या पदाचा शिष्टाचारपूर्वक उल्लेख करावा.

(२) भाषा सरळ, सुगम, सुस्पष्ट व विषयानुरूप असावी.

(३) पत्रात केवळ मुख्य विषयाबाबतच लिहावे.

(४) ज्यांना पत्र पाठवायचे आहे त्यांचे पद, वय, योग्यता, शिक्षण इत्यादी सर्व गोष्टी लक्षात घेऊन योग्य भाषेचा वापर करावा.

(५) पत्राची भाषा लेखननियमांनुसार असावी.

औपचारिक पत्र लिहिण्यासाठी खाली दिलेल्या प्रारूपाचा अभ्यास करा.

 

पान क्र. 5 वरील पत्राचा नमूना

कृती- वरील प्रारूपाचा अभ्यास करून खालील विषयावर पत्रलेखन करा.

तुमच्या शाळेमध्ये उन्हाळी सुट्टीत 'हस्ताक्षर सुंदर करूया!' हे १० दिवसांचे शिबिर आयोजित केले आहे. त्यात तुम्हांला सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र वर्गशिक्षकांना लिहा.

पत्र

                                           दिनांक - ३०/०५/२०२३

मा. वर्ग शिक्षक,

इयत्ता ८वी

जि.प.प्राथमिक कन्नड शाळा, बबलाद

      अर्जदार: कु. मानसी कृष्ण ऐवळे

विषय: सुट्टीत 'हस्ताक्षर सुंदर करूया या उपक्रमामध्ये सहभागी करून घेण्याची विनंतीबाबत.

     मननीय गुरुजी,

     मी आपल्या शाळेत इयत्ता आठवीच्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी असून उन्हाळी सुट्टीत शाळेने दि. ०५/०५/२०२३ पासून दि. १५/०५/२०२३ पर्यन्त हस्ताक्षर सुंदर करूया शिबीर आयोजित करीत आहे. माझे हस्ताक्षर सुधारण्याकरिता मी सदर शिबिरामध्ये सहभाग घेऊ इच्छित असून मला सहभाग करून घ्यावे ही विनंती.

                                  आपलीच आज्ञाधारक विद्यार्थिनी

                                           मानसी

टीप : औपचारिक व अनौपचारिक दोन्ही प्रकारची पत्रे आज तंत्रज्ञानाच्या साहाय्याने म्हणजे ईमेलद्वारा पाठवली जातात. ईमेल पाठवण्याचे पत्राचे प्रारूप व तंत्र जाणून घेण्याचा प्रयत्न करा..

 

भाषासौंदर्य

आलंकारिक शब्दांची रचना करून भाषेचे सौंदर्य वाढवता येते. आपले विचार अधिक परिणामकारक, अधिक आकर्षक होण्यासाठी आलंकारिक शब्दांचा उपयोग केला जातो. खाली काही आलंकारिक शब्द दिलेले आहेत. त्यांचा अभ्यास करा व लेखनात उपयोग करा. या शब्दांप्रमाणे इतर काही आलंकारिक शब्दांची यादी तयार करा.

गळ्यातला ताईत - अत्यंत प्रिय व्यक्ती

बाळकडू - लहानपणीचे संस्कार

काथ्याकूट - निष्फळ चर्चा

अष्टपैलू - अनेक बाबींमध्ये कुशल असलेला

अळवावरचे पाणी अल्प काळ टिकणारे -

अजातशत्रू ज्याला कोणी शत्रू नाही असा -

झाकले माणिक - गुणांचे प्रदर्शन न करणारा गुणी मनुष्य

इतिश्री - शेवट

अक्षरशत्रू - निरक्षर, अशिक्षित

 

3. जिकडे तिकडे पाणीच पाणी

प्र १. आकृती पूर्ण करा.

कवीने खालील शब्दांचे वर्णन करण्यासाठी वापरलेले शब्द

 झरे  = खळखळणारे झरे

 गवत = झुळझुळणारे पोपटी गवत

 तुरे = लवलवणारे तुरे

 पाखरे = भिरभिरती पाखरे

प्र. २. खालील मानवी कृती करणारे कवितेतील घटक कोणते ते लिहा.

   मानवी कृती                   कृती करणारे कवितेतील घटक

(१) सुखात नाहणे               पाने -फुले  

(२) भिजणे                     निळसर डोंगर

(३) उड्या मारणे                 निर्झर

(४) बागडणे                     ऊन

प्र. ३. कवितेतील खालील ओळींचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.

(अ)     नवी लकाकी झाडांवरती-

उत्तर:- भर पावसात झरे झुळ झुळ वाहतात, गवत उत्साहात नाचतात. झाडांची पाने-फुले पण नव्या तेजाने नाहतात असे कवि म्हणतात.

(आ)   हिरव्या रानी ऊन बागडे-

उत्तर:- वारा उसळी घेऊन वाहतो. ढग गरजतो. हरिणसारखी ऊन सावलीचा खेळ खेळतो.

 

प्र. ४. तुमच्या शब्दांत लिहा.

(अ) कवीने कवितेत वर्णन केलेले दृश्य तुमच्या शब्दांत लिहा.

उत्तर:- कवि भर पावसाच्या दिवसाचे वर्णन या कवितेमध्ये करतात. इकडे तिकडे पाणीच पाणी आहे. झरा झुळ झुळ वाहतो, गवत नाचतात. झाडावरती नवी ललाकी येते. पाने-फुले सुखात नाहतात. पाखरे पावूसवारा झेलीत भिरभिर फिरतात. निळसर डोंगर हसतो. त्यातून निर्झर उद्या मारतो. वारा वाहते. ढग गरजतो. हरिणसारखी ऊन हिरव्या गवतावरी ऊनसावलीचा खेळ खेळतो.

 

(आ) 'जिकडे तिकडे पाणीच पाणी', अशी कल्पना करा व लिहा.

उत्तर:- पावसात सर्वाकडे पाणीचपाणी साचलेले असते. आभाळ गरजतो. धारा वाहतात. वीज गडगडाट करते. प्राणी पक्षी निवार्‍यासाठी आसरा शोधत फिरतात. पावसाळ्यामध्ये सगळीकडे आनंदी आनंद असतो.

चर्चा करूया.

कवितेचा अभ्यास केल्यानंतर निसर्गातील काही घटक माणसासारखे वागतात / कृती करतात हे काही शब्दांवरून लक्षात येते.

उदा., 'पाऊसवारा झेलणे' यांसारख्या शब्दांबाबत चर्चा करून यादी तयार करा.

उपक्रम : पाऊस पडून गेल्यानंतर निसर्गात झालेल्या बदलांचे निरीक्षण करा, वर्गात सांगा.

 

. सावलीतून जा आणि सावलीतून ये

प्र.१. तुलना करा.

अवी

रवी

खूप आळशी , उशिरा उठायचे, भूक लागली की जेवायचे, कामाचा कंठाळा करतो.

सकाळी लवकर उठतो, व्यायाम करतो. अभ्यास करतो. वडिलांना कामात मदत करतो.

प्र. २. आकृती पूर्ण करा.

गणेशरावांकडे असलेली धनदौलत- खूप जमीनजुमला-शेतीवाडी, दोन-तीन दुकाने

गणेशरावांनी मुलांना संगीतलेली तीन गोष्टी- गणेशराव म्हणाले, ‘‘पहिली गोष्ट,  रो सावलीतून कामाला जा आणि सावलीतूनच घरी या. दुसरी गोष्ट, रोज गोड खा आणि ति सरी गोष्ट आजूबाजूच्या प्रत्येक गावात एकेक घर बांधा. या तीन गोष्टीचं पालन तुम्ही केलं, तर तुम्ही सुखाने रहाल.’

प्र.३. कारणे शोधा.

(अ) अवीची संपत्ती झपाट्यानं कमी होऊ लागली, कारण

उत्तर:-    अवीला वाटले, बाबांनी सांगितलेल्या तीन गोष्टी तर अगदीच सोप्या आहेत. कामाला सावलीतून जा सावलीतून ये असं बाबांनी  सांगितलं. चला, घरापासून दुकानापर्यंत, शेतापर्यंत मांडवच घालून घेऊया. त्याप्रमाणे त्याने मांडव घालून घेतला. वडिलांनी सांगितल्याप्रमाणे रोज पक्वान्नाचं जेवण सुरू केलं आणि आजूबाजूच्या गावांमध्ये घरं बांधणंही सुरू केलं. एवढा सगळा खर्च आणि काम मात्र काहीच नाही . त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. त्याची संपत्ती झपाट्याने कमी होऊ लागली.

 (आ) अवी चिडला, कारण......

उत्तर:- अवीला बाबांचा उपदेश निट समझले नव्हते. वडिलांच्या उपदेशाप्रमाणे केले तरी संपत्ति कमी झाली म्हणून तो चिडला.

प्र. ४. तुमच्या शब्दांत लिहा.

(अ) अवीने त्याच्या बाबांच्या सूचनांचा लावलेला अर्थ तुम्हांला पटला का ? सकारण स्पष्ट करा.

उत्तर:- अवीला बाबांचा उपदेश निट समझले नव्हते. वडिलांच्या उपदेशाप्रमाणे केले तरी संपत्ति कमी झाली. सावलीतून ये सावलीतून जा म्हणजे लवकर जा व सायंकाळी काम संपल्यावर ये असा होता. तो अवीला समझले नाही.

 आ) तुम्हांला जाणवलेले रवीचे गुण लिहा.

उत्तर:- रवी प्रामाणिक व कष्टाळू मुलगा होता. वडिलांच्ये उपदेश चांगल्या पद्धतीने समझून समाजात मिळून मिसळून राहत असे. सर्वांशी प्रेमाने व सहकार्याने वागत असे.

खेळूया शब्दांशी.

()  तक्त्यात दिलेल्या शब्दांचे वचन बदला.

एकवचन

अनेकवचन

(१) सावली

सावल्या

(२) घर

घरे

(३) गोष्ट

गोष्टी

(४) दुकान

 दुकाने

(५) गाव

 गावे

(६) झरा

झरे

  (आ)   खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.

(अ) श्रीमंत x गरीब           (आ) गर्विष्ठ x शांत

(इ)  आळशी x कामसु        (ई) हळूहळू X वेगाने

() वाढ X खुंटणे                    (ऊ) सोपे x अवघड

 (इ) वर्गीकरण करा.

श्रीमंत, माणूस, विचारले, मी, बसणे, फुले, ती, छोटी

नाम

सर्वनाम

विशेषण

क्रियापद

श्रीमंत

माणूस

मी

फुले

ती

छोटी

विचारले

बसणे

 

 

चर्चा करूया.

'आळसामुळे प्रगती होत नाही', या विषयावर मित्रमैत्रिणींशी वर्गात चर्चा करा.

·        खालील उतारा वाचा त्यास योग्य शीर्षक दया.

सज्जनांचे संगत घडो

     प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सुखदुःखाचे क्षण नेहमीच येत असतात. दुःखाच्या व अडचणीच्या प्रसंगांना जे खिलाडू वृत्तीने सामोरे जातात, जे जिंकण्याच्या उर्मीने हाती घेतलेले काम पूर्ण करण्यासाठी स्वयंप्रेरणेने काम करतात, तेच आयुष्यात यश मिळवतात. कोणतीही वाईट परिस्थिती तुम्हांला अडवू किंवा हरवू शकत नाही. वेळप्रसंगी तुम्हांला दोन पावले मागेही टाकावी लागतात; परंतु जर आपण मनानेच हरलो, तर पुढील कार्य पूर्ण करण्यासाठी आपण तयार होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत कायम आपले आपल्या मनावर नियंत्रण असणे आवश्यक असते.

     नकारात्मक विचार करण्यापासून आपण स्वतःला थांबवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आपल्या मनाला चांगल्या सवयी लावणेही आवश्यक आहे. आपल्या मनाला चांगली सवय लावणे हे कठीण असले, तरी अशक्य मात्र नक्कीच नाही! आपल्या अंगी असणाऱ्या चांगल्या सवयी, वाईट सवयींना जवळ येऊ देत नाहीत. मनाला चांगल्या विचारांची सवय लावली, तर ती सवय वाईट विचारांपासून तुम्हांला नक्कीच दूर ठेवील.

     यासाठी तुम्हांला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. उदा., चांगले वाचन, चांगल्या मित्रमैत्रिणींची संगत, घरातील ज्येष्ठ व्यक्तींशी असणारे जिव्हाळ्याचे व आपुलकीचे संबंध इत्यादी. जो दुसऱ्याच्या दुःखात नेहमी सहभागी होतो त्यालाच जीवनाचा खरा अर्थ कळतो. मानसिक आधार देऊन, विचारांच्या देवाणघेवाणीतून आपण एकमेकांचे दुःख सहज हलके करू शकतो.

     असे सुखदुःखाचे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात सतत येत असतात मात्र या प्रसंगांना जो धीराने सामोरा जातो, तोच जीवनात यशस्वी होतो

 

बातमी लेखन

     दैनंदिन व्यवहारात घडणाऱ्या घटनांच्या बातम्या आपण वृत्तपत्रे, टी. व्ही., रेडिओ यांसारख्या माध्यमांतून वाचत व ऐकत असतो. त्यामुळे घडून गेलेल्या, घडत असलेल्या आणि घडणाऱ्या विविध घटनांविषयी आपणाला सविस्तर माहिती बातमीच्या माध्यमातून मिळत असते.

बातमी लेखनासाठी आवश्यक गुण-

(१) लेखन कौशल्य. (२) भाषेचे उत्तम ज्ञान. (३) व्याकरणाची जाण (४) सोपी, सुटसुटीत वाक्यरचना. (५) चौफेर वाचन.

बातमीची विविध क्षेत्रे : सांस्कृतिक, क्रीडा, कृषी, शैक्षणिक, सामाजिक, वैज्ञानिक, दैनंदिन घटना.

·        खालील बातमी वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, उत्रौली या शाळेत कला शिबिराचा समारोप संपन्न.

दिनांक : २० डिसेंबर

लोकप्रतिभा

चित्रकला शिबिराचा समारोप

     उत्रौली (ता. भोर): उत्रोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दहा दिवसांचे चित्रकला शिबिर नुकतेच संपन्न झाले. १९ डिसेंबर रोजी दुपारी ४.०० ते ६.०० या वेळात शिबिराचा समारोप समारंभ साजरा झाला. या शिबिराची सांगता प्रसिद्ध चित्रकार श्री. अविनाश शिवतरे यांच्या सप्रात्यक्षिक मनोगताने करण्यात आली.

     आपल्या जीवनातील कलेचे महत्त्व सांगताना प्रत्येकाने कोणती ना कोणती कला शिकणे आवश्यक आहे, हा विचार त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला. समारंभाचे अध्यक्षस्थान प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. सदाशिव शिंदे यांनी भूषवले. कलाशिक्षिका श्रीमती सुनीता सोमण यांनी प्रमुख पाहुणे व उपस्थितांचे आभार मानले.

     या निमित्ताने सर्व पंचवीस शिबिरार्थींच्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. त्याला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.

(१) कोण ते लिहा.

(अ) समारंभाचे प्रमुख पाहुणे- प्रसिद्ध चित्रकार श्री. अविनाश शिवतरे

(आ) समारंभाचे अध्यक्ष- शाळेचे मुख्याध्यापक श्री. सदाशिव शिंदे

(इ) चित्रकला प्रदर्शनास प्रतिसाद देणारे- रसिक

(२) उत्तरे लिहा.

(अ) शिबिरार्थीची संख्या-२५

(आ) शिबिरार्थींनी शिबिरात शिकलेली कला- चित्रकला

(इ) शिबिराचे ठिकाण- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उत्रौली ता. भोर येथील

(ई) शिबिर सुरू झाले ती तारीख-डिसेंबर

(३) वरील बातमीमध्ये ज्या ज्या गोष्टींविषयी माहिती दिलेली आहे ते घटक लिहा.








. कोळ्याची पोर

 ऐका. वाचा. म्हणा.

मी कोळ्याची गं बाई कोळ्याची पोर

कपाळावर माझ्या चंद्राची कोर

गं बाई मी कोळ्याची पोर ।।धृ.।।

दर्याला रं आलं तुफान

पाहून गं होते बेभान

तुफानी दर्याची उसळत्या लाटांची

नाही हो मला कसलीच डर ।।१।।

होरी चालवते वल्ही मारूनी

पुढे नेते मी लाटा सारूनी

टाकुनी फासे विकुनी मासे

संसार चाले हा दर्या वर ।।२।।

सोन्या च्या मढवुनी नारळाला

बाई अर्पण करते सागराला

कोळीवाडा उजळे पुनवेला

पूजा सागराची चाले जीवनभर ।।३।।

     सुरेखा गावंडे : प्रसिद्ध कवयित्री,  त्यांच्या विविध विषयांवरील काव्यरचना प्रसिद्ध आहेत. विविध वृत्तपत्रे मासिके यांतून त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे. समुद्रकाठचे लोक दैनंदिन जीवन जगताना सदैव आव्हानांना, संकटांना तोंड देत असतात. समुद्र हेच त्यांचे श्रद्धास्थान असते. समुद्रकाठी राहणाऱ्या कोळी समाजातील मुली या देखील अत्यंत साहसी असतात. प्रस्तुत कवितेतून एका कोळ्याच्या मुलीचे भावविश्व कवीने अतिशय समर्पक शब्दांत मांडले आहे.

शब्दार्थ : पोर - मुलगी. तुफान - वादळ. बेभान - भान नसणे, शुद्ध नसणे. दर्या- सागर, समुद्र. होरी - होडी. फासे - जाळे. मढवणे - मुलामा देणे. अर्पण करणे

श्रद् धापूर्वक भेट देणे. उजळणे - प्रकाशणे. पुनव - पौर्णिमा.

प्र. . आकृती पूर्ण करा.

 (अ)

          


(आ) कवितेतून लक्षात येणारी कोळी समाजाच्या जीवनाची वैशिष्ट्ये

     1. कोळी समाजाचे उदरपोषण हे दर्‍यावरील मासेमारीतून होत असते.

     2. सागराला देव मानून प्रतिवर्ष नारळी पौर्णिमेला सण साजरा करतात.

     3. कोळी समजतील मुली पण धाडसी असतात.

 

प्र. . खालील गोष्टी कोळ्याची पोर कशा सजवते?

() स्वत:चे कपाळ- कपाळावर चंद्राची कोरसारखे कुंकू लावते.

() सागराला अर्पण करायचा नारळ- सोन्याचे नारळला मढवते.

प्र. . कवितेतील खालील ओळींचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

(अ)      कोळीवाडा उजळे पुनवेला

नारळी पौर्णिमेला सागरकिनार्‍यावर राहणार्‍या कोळी लोकांचा सण असतो. सागराला नारळ मढवून अर्पण करतात व आपले जीवन चांगले चालू दे म्हणून सागर देवीला नवस बोलतात. नारळी पौर्णिमेच्या दिवशी सर्वाकडे उजळा असतो. म्हणून कोळीवाडा पुनवेला उजळून निघतो असे कवि म्हणतात.

() टाकुनी फासे विकुनी मासे संसार चाले हा दर्या वर।

मासेमारी कोळी लोकांचे व्यवसाय आहे. त्यांचे जीवन सारा मासेमारीवर चालते. सागरात फासे टाकून मासे पकडतात. मासे विकून जीवन संसार चालवतात. त्यामुळे दर्यावर आपले सर्वकाही चालते म्हणून दर्याराजला देवसारखे मानतात.

 

 

 खेळूया शब्दांशी

() खालील शब्दांसाठी कवितेत आलेले शब्द शोधून लिहा.

() कन्या पोर

() समुद्र- सागर, दर्या

() भीती- डर

() वादळ- तुफान

() पौर्णिमा- पुनव

() कवितेतील खालील शब्दांसारख्या उच्चाराचे शब्द शोधून लिहा.

उदा., पोर-कोर

() तुफान- बेभान

() मारूनी- सारूनी


() नारळाला- सागराला

 वाचा

 खालील उतारा वाचा.

मैदाने वाचवूया

     मोकळ्या मैदानावर तास-दीड तास खेळल्या नंतर मुलांचे चेहरे प्रसन्न दिसतात. मोकळी हवा त्यांना हवीहवीशी वाटू लागते. लहान वयातच खेळाची आवड लागली तर शारीरिक मानसिक स्वास्थ्य लाभते. भविष्यात कोणतेही काम सहजतेने करण्याची शारीरिक मानसिक क्षमता निर्माण होते, टिकून राहते.

पूर्वी मिळेल त्या जागेवर आवडेल तो खेळ खेळताना मुले दिसत. खेड्यापाड्यात अजूनही मोकळ्या मैदानात मुले बागडताना, खेळताना दिसतात. खेळ कोणताही असो, तो मुलांनी खेळलाच पाहिजे. त्या मुळे शरीराला व्यायाम मिळतो. शहरातील मुलांनाही खेळण्याची खूप इच्छा असते; परंतु खेळायचे कोठे? असा प्रश्न त्यांना नेहमीच भेडसावत असतो, कारण शहरात मोकळी मैदाने शोधून सापडेनाशी झाली आहेत. मुलांच्या आरोग्य संपन्नतेसाठी मैदानाची जरूरी असते, म्हणून सुजाण नागरिकांनी मैदाने वाचवण्या साठी प्रयत्न केले पाहिजेत सर्वांनी त्यांना साथ दिली पाहिजे.

चला संवाद लिहूया.

होडी आणि समुद्र यांचं संभाषण:

होडी: नमस्कार, समुद्र दादा! कसं आहेस तू आज?

समुद्र: नमस्कार होडी, मी मस्त आहे. तुमचं कस चाललाय?

होडी: तुमच्या माध्यमातून प्रवाश्यांना सागरी प्रवास करून देताना फार आनंद होतो मला. तुमच्यामुळे मीपण सागर प्रवाष्याचे अद्भुत अनुभव घेत असतो.

समुद्र: धन्यवाद मित्रा, मला मोठेपण दिल्याबद्दल. तुमच्या साथ असल्याने मला आनंद होत असते. तुम्हाला सुखरूपपणे सागर विहार करवून किनारवरती सोडणे ही माझी महत्वाची जवाबदारी आहे.

होडी: हो, तुम्हाला मला साथ देताना आणि मला सुरक्षितपणे जाण्यात मदतीला आनंद होतं. आपल्या समुद्री गहनता अद्भुत आहे.

समुद्र: धन्यवाद! आपल्याला सदैव सुरक्षित आणि आपल्या प्रयासांतील सफलता लाभो ही माझी इच्छा आहे.

होडी: धन्यवाद, परत भेटू या नवे प्रवाश्यांना घेवून.

समुद्र: बर, यावे यावे, आपले स्वागत असेल कधीही. मला आपल्याला उरण्यात व फिरवण्यात सहाय्य करण्यात आनंद होईल. 

  . ध्येयपूर्ती चा ध्यास

लक्ष्मण लोंढे : प्रसिद्ध लेखक. त्यांचे विविध विषयांवरील लेखन प्रसिद्ध आहे. विविध वृत्तपत्रे मासिके यांतून त्यांनी लेखन केले आहे. बालवयात मनाला भावलेल्या एका सुंदर पक्ष्याच्या भेटीसाठी या कथेतील मुलाचे मन ध्यास घेते. जीवनाच्या अंतापर्यंत

त्याचा शोध घेण्याचा ध्यास चालू राहतो. शेवटी त्याची ध्येयपूर्ती होते आणि त्याला समाधान मिळते. खडतर परिश्रमाने ध्येयप्राप्ती होते, हा संदेश प्रस्तुत पाठातून मिळतो. प्रस्तुत पाठ हालक्ष्मणायनया पुस्तकातून घेतला आहे.

 

शब्दार्थ : डव्हरा - डोह. जंगलवासी - जंगलात राहणारा. गोंजारणे - हळूवारपणे हात फिरवणे. धुंडणे - शोधणे. पशुवत- पशूप्रमाणे. शय्या - अंथरूण.

त्राण उरणे - ताकद उरणे. श्रांत झालेला - थकला भागलेला. साक्षात्कार होणे- अनुभवास येणे. जगाचा अखेरचा निरोप घेणे- मृत्यू येणे.

प्र. . आकृती पूर्ण करा.


(आ)     आवडणाऱ्या पक्ष्या बरोबर मुलाला काय काय करायचे होते?

उत्तर: एका आदिवासी जमतीतला मुलगा पाणी पीत असताना यापूर्वी कधीही न पाहिलेलं सुंदर पक्षी पाहतो. तो पक्षी त्याला फार आवडते. मुलाला त्या पक्षी पुनः पहायचे इच्छा होते. शक्य झाल तर त्याला तो पकडणार होता. त्याच्या मोरपंखी पिसावरून अलगदपणे हात फिरवणार होता, त्याला गोंजारणार होता.

 

प्र. . वृद्ध झालेल्या मुलाने जगाचा निरोप घेताना केलेल्या कृतींचा आणि घटनांचा ओघतक्ता तयार करा.

प्र. . कारणे शोधा.

() जंगलवासी मुलगा पाणी पिण्या चे विसरला, कारण तो पक्षी त्याला फार आवडला होता.

() जंगलवासी मुलाचा पक्ष्याचा शोध चालूच होता, कारण......

() वृद्ध झालेला मुलगा उंच पर्वत चढू लागतो, कारण......

प्र. . तुमच्या शब्दांत लिहा.

() जंगलवासी मुलाला तो पक्षी इतका का आवडला असेल, याचे स्पष्टीकरण तुमच्या शब्दांत लिहा.

() ही लोककथा अनेक वर्षांपासून सांगितली जाते याचे लेखकाने सांगितलेले कारण तुमच्या शब्दांत लिहा.

() मोठेपणी तुम्हांला कोण व्हायचे आहे? तेच का व्हायचे आहे ते स्पष्ट करा.

खेळूया शब्दांशी.

() खालील वाक्यांत योग्य विरामचिन्हे घाला.

() लालसर चोच निळी मोरपंखी पिस आणि पोपटी पोट असलेला तो अगदी छोटा चिमणीएवढा पक्षी होता

उत्तर: लालसर चोच, निळी मोरपंखी पिस आणि पोपटी पोट असलेला तो अगदी छोटा चिमणीएवढा पक्षी होता.

 

() अखेर पर्वताची सर्वात उंच बर्फानं झाकलेली शिखरं येतात

उत्तर: अखेर पर्वताची सर्वात उंच बर्फानं झाकलेली शिखरं येतात.

() एकदा ते मिळालं की त्याच्या पूर्तीचा ध्यास लागला पाहिजे नव्हे तो लागतोच

उत्तर: एकदा ते मिळालं की, त्याच्या पूर्तीचा ध्यास लागला पाहिजे, नव्हे तो लागतोच.

() खालील वाक्प्र चारांचा योग्य अर्थ शोधा.

() त्राण उरणे-

() खूप त्रास होणे.   () दुसऱ्याला त्रास देणे.   () ताकद उरणे.

उत्तर: () ताकद उरणे.

 

() जगाचा निरोप घेणे-

() जग कायमचे सोडून जाणे.     () जगाला त्रासणे.   

() जगाचा सांभाळ करणे.

उत्तर: () जग कायमचे सोडून जाणे.

() खालील विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या जुळवा.

(सुंदर, शिखर, म्हातारा, अलीकडे)

() तरुण   x  म्हातारा

() कुरूप x  सुंदर

() पलीकडे  x  अलीकडे

() पायथा x शिखर

चर्चा करूया.

पक्ष्याचा शोध घेण्यात सबंध जीवन घालवणाऱ्या वृद्ध झालेल्या मुलाचे वागणे योग्य की अयोग्य यावर वर्गात चर्चा करा.

लिहिते होऊया.

खालील मुद्द्यांच्या आधारे आठ ते दहा वाक्यां चे भाषण तयार करून लिहा.

माझा आवडता छंद

तुमचा छंद

तो छंद कसा लागला?

छंद कसा पूर्ण करता?

छंदाचे फायदे

तुम्हांला कशाचा शोध घ्यायला आवडेल? त्यासाठी तुम्ही काय-काय कराल, ते

लिहा.

 

आपण समजून घेऊया.

() केवलवाक्य

() ती रोज सकाळी लवकर उठते.

() तो कसोटी सामन्यात खेळतो का?

ही केवलवाक्ये आहेत. केवलवाक्यात एकच विधान असते, त्या मुळे एक उद्देश्य एकच विधेय असते. केवलवाक्य हे विधानार्थी , प्रश्नार्थी , आज्ञार्थी ,

होकारार्थी किंवा नकारार्थी यांतील कोणत्याही प्रकारचे असू शकते.

() मिश्र वाक्य

() जेव्हा मनात येईल, तेव्हा मी गावाला जाईन.

() पावसाळा आला, की आकाशात काळे ढग जमतात पाऊस पडू लागतो.

ही मिश्र वाक्ये आहेत. मिश्र वाक्यांत दोन किंवा अधिक वाक्ये असतात, जी एकमेकांवर अवलंबून असतात. अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असणारे वाक्यमुख्य

वाक्यअसते, तर मुख्य वाक्यावर अवलंबून असणारे वाक्य गौणवाक्य असते.

उदा., वरील वाक्यां मी गावाला जाईन पावसाळा आलाही दोन मुख्य वाक्ये आहेत. कधीकधी एका मुख्य वाक्यावर एक किंवा अधिक गौणवाक्ये अवलंबून असतात. ही गौणवाक्ये उभयान्वयी अव्ययाने एकमेकांना जोडलेली

असतात.

() संयुक्तवाक्य-

() मंदा रोज सकाळी गणिताचा अभ्यास करते आणि संध्याकाळी मराठीचा अभ्यास करते.

() मिहिरखो खो भाग घेईल किंवा लंगडी खेळेल.

ही संयुक्तवाक्ये आहेत. संयुक्तवाक्यात दोन वाक्ये असतात. ती दोन वाक्ये उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात; पण ती स्वतंत्र असतात, म्हणजे

ती दोन केवलवाक्ये असतात. अर्थाच्या दृष्टीने ती एकमेकांवर अवलंबून नसतात. ते एक जोडवाक्य असते.

जाहिरात लेखन

खालील जाहिरातीचे वाचन निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.



() उत्तरे लिहा.

() जाहिरातीचा विषय -  शाळेत मुलांना प्रवेश देणे

() जाहिरात देणारे (जाहिरातदार) -  मुख्यद्यापक जि. प. वरिष्ठ प्राथमिक मराठी शाळा विजयपुर आणि  व्यवस्थापन समिति, मोरगाव

() वरील जाहिरातीत सर्वांत जास्त आकर्षित करून घेणारा घटक डिजिटल शाळा

() जाहिरात कोणासाठी आहे? विद्यार्थ्यासाठी व पालकासाठीही

() वरील जाहिरात अधिक आकर्षक होण्यासाठी त्यांत कोणकोणत्या घटकांचा समावेश असावा, असे तुम्हांला वाटते?

() तुमच्या मते जाहिरातीमधील महत्त्वाची वैशिष्ट्ये.

ಕಾಮೆಂಟ್‌‌ ಪೋಸ್ಟ್‌ ಮಾಡಿ

0 ಕಾಮೆಂಟ್‌ಗಳು